menu-iconlogo
logo

Kevadyacha Paan Tu (केवड्याचं पान तू)

logo
Testi
(M) केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं गं भान तू

केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं गं भान तू

(F) सागराची गाज तू

गालावर लाज तू

आतुरल्या डोळ्याचं सपान तू

(M) केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं गं भान तू

(F) केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं रं भान तू

(F) तू रे गाभुळला मेघ

तुझ्या पिरतीची धग

सुख ओंजळीत आज माईना

सुख ओंजळीत आज माईना

(M) ओ तुझा मातला मोहर

तुझ्या मिठीत पाझर

येड्या काळजाचा तोल ऱ्हाईना

येड्या काळजाचा तोल ऱ्हाईना

(F) मेघुटाची हूल तू

चांदव्याची भूल तू

भागंना तरी अशी तहान तू

(M) केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं गं भान तू

(F) केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं रं भान तू

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

(F) आ आ आ तुझ्या डोळ्याची कमान

तिथं ओवाळीन प्राण

व्हईन बुफाट्यात तुझी सावली

व्हईन बुफाट्यात तुझी सावली

(M) तुझ्या जोडीनं गोडीनं

हरपुनी देहभान

आणीन लक्ष्मीला सोनपावली

आणीन लक्ष्मीला सोनपावली

(F) जगण्याची रीत तू

खोप्यातली प्रीत तू

कवाच्या रं पुण्याईचं दान तू

(M) केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं गं भान तू

(F) केवड्याचं पान तू

कस्तुरीचं रान तू

पाघुळल्या जिवाचं रं भान तू