menu-iconlogo
logo

Mohrachya Daravar (From Baban)

logo
Testi
मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं

मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं

घाई बरी नाही धीर धराना

रात गात आहे ज्वानीचा तराना

घाई बरी नाही धीर धराना

रात गात आहे ज्वानीचा तराना

खुलु लागल्या ओठांच्या पाकळ्या

पडल्या पैंजणांच्या पायात साखळ्या

खुलु लागल्या ओठांच्या पाकळ्या

पडल्या पैंजणांच्या पायात साखळ्या

मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

रात शेंदरी पायात भिंगरी

तुझ्या इशाऱ्याने ही काया रंगली

रात शेंदरी पायात भिंगरी

तुझ्या इशाऱ्याने ही काया रंगली

गोड गुपिताने हि रात मंतरू

अंधार पांघरू अंधार अंथरु

स्वप्नात झोपणं स्वप्नात जागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

पहिल्या धारेची मी महा मोलाची

झिंगविते राणी तुला तुझ्या दिलाची

पहिल्या धारेची मी महा मोलाची

झिंगविते राणी तुला तुझ्या दिलाची

मस्तीमधी नाचतेया एक पाखरू

डोलू लागलया हवेचे हे लेकरू

मस्तीमधी नाचतेया एक पाखरू

डोलू लागलया हवेचे हे लेकरू

पुन्हा पुन्हा पाकळीच्या नादी लागण

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

घाई बरी नाही धीर धराना

रात गात आहे ज्वानीचा तराना

घाई बरी नाही धीर धराना

रात गात आहे ज्वानीचा तराना

अंगाला शहारा बेधुंद पालवी

भेटीचा एक तारा अंधार घालवी

अंगाला शहारा बेधुंद पालवी

भेटीचा एक तारा अंधार घालवी

मेणाची ही काया भोवती मशाली

ओठांनी वीचारावी ओठांना खुशाली

वाया घालवीती तरुण चांदण

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं

काय बाई एका एकाचं वागणं