menu-iconlogo
logo

Konachya Khandyavar Konache Ojhe

logo
Testi
कुणाच्या खांद्यावर, कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?

कुणाच्या खांद्यावर, कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?

कशासाठी उतरावे, तंबू ठोकून?

कोण मेले कोणासाठी, रक्त ओकून?

कशासाठी उतरावे, तंबू ठोकून?

कोण मेले कोणासाठी, रक्त ओकून?

जगतात येथे कोणी, मनात कुजून..

तरी कसे फुलतात, गुलाब हे ताजे?

कुणाच्या खांद्यावर, कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?

कुणाच्या खांद्यावर, कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?

दीप सारे जाती येथे, विरून, विझून

वृक्ष जाती अंधारात, गोठून, झडून

दीप सारे जाती येथे, विरून, विझून

वृक्ष जाती अंधारात, गोठून, झडून

जीवनाशी घेती पैजा, ठोकून घोकून,

म्हणती हे वेडे पीर, तरी आम्ही राजे!

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,

वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी.

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,

वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी.

देई कोण हळी त्याचा, पडे बळी आधी,

हारापरी हौतात्म्य हे, त्याच्या गळी साजे

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें?

कुणाचें ओझें?कुणाचें ओझें?कुणाचें ओझें?

Konachya Khandyavar Konache Ojhe di Ravindra Sathe - Testi e Cover