menu-iconlogo
logo

Dur Dur

logo
歌詞
पेटलं आभाळ सारं, पेटला हा प्राण रे

उठला हा जाळ आतून करपलं रान रे

उजळताना जळुन गेलो राहील ना भान

डोळ्यातल्या पाण्यानेही विझेना तहान

दूर दूर चालली आज माझी सावली...2

कशी सांज ही उरी गोठली

उरलो, हरलो, दुःख झाले सोबती...2

काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला

मी इथे अन् तो तिथे हा खेळ आता संपला

मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा

रोज हातून जाळतो मी वेदनेचा गाव हा

अपुलाच तो रस्ता जुना,

अपुलाच तो रस्ता जुना

मी एकटा चालू किती

उरलो, हरलो, दुःख झाले सोबती...2

ना भरोसा ना दिलासा कोणता केला गुन्हा

जिंकुनीही खेळ सारा हारते मी का पुन्हा

त्रास लाखो, भास लाखो, कोणते मानू खरे

कोरड्या त्या पावसाचे ह्या मनावर का चरे

समजावतो या मना, समजावतो मी या मना

तरी आसवे का वाहती

उरलो हरलो दुःख झाले सोबती

Dur Dur by Adarsh Shinde/Bela Shende/Swapnil Bandodkar - 歌詞&カバー