जग जोगी जग जोगी जागजाग बोलती
जग जोगी जग जोगी जागजाग बोलती
जागता जगदेव राखा कांहीं भाव
जागता जगदेव राखा कांहीं भाव
अवघा क्षेत्रपाळ पूजा सकळ
अवघा क्षेत्रपाळ पूजा सकळ
पूजापात्र कांहीं फल पुष्प तोय
पूजापात्र कांहीं फल पुष्प तोय
बहुतां दिसां फेरा आला या नगरा
बहुतां दिसां फेरा आला या नगरा
नका घेऊं भार धर्म तो चि सार
नका घेऊं भार धर्म तो चि सार
तुका मागे दान द्या जी अनन्य
तुका मागे दान द्या जी अनन्य
हो जग जोगी जग जोगी जागजाग बोलती
जग जोगी जग जोगी जागजाग बोलती
जग जोगी जग जोगी जागजाग बोलती