menu-iconlogo
logo

Ek L a N S a एक लाजरा न्‌ साजरा मुखडा

logo
歌詞
गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – राम कदम

स्वर – अरुण सरनाईक, उषा मंगेशकर

चित्रपट–चंदनाची चोळी अंग अंग जाळी (१९७५)

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं

लाज आडवी येती मला की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं ऱ्हाऊ

का? ….

बघत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

Interlude

रेशिम विळखा, घालुन सजना नका हो कवळुन धरू

कां,

लुकलुक डोळं करुन भोळं बगतंय फुलपाखरू

कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं

लाज आडवी येती मला की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं ऱ्हाऊ

का? ….

बघत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

Interlude

डोळं रोखुन थोडं वाकुन झुकू नका हो फुडं

कां?

गटर्गुम गटर्गुम करून कबूतर

बघतंय माज्याकडं

लई दिसानं सखे आज ह्यो धागा जुळला गं

लाज आडवी येती मला की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं ऱ्हाऊ

का? ….

बघत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

Interlude

बेजार झाले सोडा सजणा शिरशिरी आली अंगा

कां?

मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा

मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं?

लाज आडवी येती मला की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं ऱ्हाऊ

का? ….

बघत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

धन्यवाद

14032017