menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Chandra Aahe Sakshila : चंद्र आहे साक्षीला

Asha Bhosle/Sudhir Phadkehuatong
natinvbhuatong
歌詞
レコーディング
स्वर आशा भोसले , सुधीर फडके

संगीत सुधीर फडके

गीत जगदीश खेबूडकर

चित्रपट चंद्र होता साक्षीला

Prelude

पान जागे फूल जागे,

भाव नयनीं जागला

चंद्र आहे साक्षीला,चंद्र आहे साक्षीला(२)

चांदण्यांचा गंध आला

पौर्णिमेच्या रात्रीला

चंद्र आहे साक्षीला,चंद्र आहे साक्षीला(२)

Interlude

स्पर्श हा रेशमी,

हा शहारा बोलतो

सूर हा, ताल हा,

जीऽऽव वेडा डोऽऽलतो

रातराणीच्या फुलांनी

देह माझा चुंबिला !

चंद्र आहे साक्षीला,चंद्र आहे साक्षीला(२)

Interlude

लाजरा, बावरा,

हा मुखाचा चंद्रमा

अंग का चोरीसी

दो जिवांच्या संगमा

आज प्रीतीने सुखाचा

मार्ग माझा शिंपिला !

चंद्र आहे साक्षीला,चंद्र आहे साक्षीला(२)

धन्यवाद

Asha Bhosle/Sudhir Phadkeの他の作品

総て見るlogo