menu-iconlogo
logo

Sajani Ga Bhulalo Mee

logo
歌詞
(M) सजणी गं

भुललो मी

सजणी गं भुललो मी काय जादू झाली

सजणी गं भुललो मी काय जादू झाली

बगून तुला जीव माझा होई वर खाली

बगून तुला जीव माझा होई वर खाली

(F) सजणा रं काय सांगू कुणी जादू केली

सजणा रं काय सांगू कुणी जादू केली

लाज मला आली बाई लाज मला आली

लाज मला आली बाई लाज मला आली

(F) काल मला ह्याची बाई जाण नव्हती

आज कशी मोहरून आली नवती

काल मला ह्याची बाई जाण नव्हती

आज कशी मोहरून आली नवती

(M) अंग चोरतिया कशी लाजाळूची येली

अंग चोरतिया कशी लाजाळूची येली

अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली

अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली

(F) हो ओss लाज मला आली बाई लाज मला आली

लाज मला आली बाई लाज मला आली

(F) लपं ना ही हुरहूर आज पदरी

शालू चोळी नेसून मी झाले नवरी

लपं ना ही हुरहूर आज पदरी

शालू चोळी नेसून मी झाले नवरी

(M) काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली

काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली

येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली

येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली

(F) हो ओss लाज मला आली बाई लाज मला आली

लाज मला आली बाई लाज मला आली

(M) सजणी गं भुललो मी काय जादू झाली

(F) सजणा रं काय सांगू कुणी जादू केली

(M) हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं