menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Anjanichya Suta Tula Ramach Vardan

Mahendra Kapoorhuatong
rdeleonmadhuatong
歌詞
レコーディング
हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

अन एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया

बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हा

बालपणी गेलासी तू सूर्याला धराया

अरे हादरली ही धरणी, थरथरले आसमान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण

हे द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण

द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण

तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

हे सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका

तिथे रामनामाचा तू वाजविला डंका

तिथे रामनामाचा तू वाजविला डंका

अरे दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला

पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला

पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला

उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

हे आले किती गेले किती संपले भरारा

तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा

तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा

धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा

तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा

तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा

घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

हे राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि ६वेळ

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि

Mahendra Kapoorの他の作品

総て見るlogo