जीव झाला येडा-पिसा रात-रात जागनं
पुरं दिसभर तुझ्या फिरतो मागं-मागनं
जीव झाला येडा-पिसा रात-रात जागनं
पुरं दिसभर तुझ्या फिरतो मागं-मागनं
जादू मंतरली कुणी, सपनात जागपनी
नशिबी भोग असा दावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
मागं पळून-पळून वाट माझी लागली
अन तू वळून बी माझ्याकडे पाहीना
हे, भिर-भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं?
अवसेची रात मी अन पुनवंचा तु चांद गं
हे, भिर-भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं?
अवसेची रात मी अन पुनवंचा तु चांद गं
नजरेत मावतीया, तरी दूर धावतीया
मनीचा ठाव तुझ्या मिळनां
आता तोंडा मोरं घास तरी गीळनां
देवा जळून-जळून जीव प्रीत जुळनां
सारी इस्कटून जिंदगी मी पाहीली
तरी झाली कुठं चूक मला कळनां
सांभी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा
लाज ना कशाची, तक्रार नाही
भास वाटतोया हे खर का सपानं
सुखाच्या ह्या सपनाला थार नाही
सांभी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा
लाज ना कशाची, तक्रार नाही
भास वाटतोया हे खर का सपानं
सुखाच्या ह्या सपनाला थार नाही
हे, रात झाली जगण्याची हाय तरी जिता
भोळं प्रेम माझं अन भाबडी कथा
बघ जगतूया कसं, साऱ्या जन्माचं हासं
जीव चिमटीत असा घावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
मागं पळून-पळून वाट माझी लागली
अन तु वळून बी माझ्याकडे पाहीना
हे, खरकट्या ताटावर रेघोट्याची झालरं
हातावर पोट, बिदागीची झुनका भाकर
हे, खरकट्या ताटावर रेघोट्याची झालरं
हातावर पोट, बिदागीची झुनका भाकर
उन्हा-तान्हात भुका, घसा पडलाय सुका
डोळ्यातलं पानीतरी खळनां
आता तोंडा मोरं घास तरी गीळनां
देवा जळून-जळून जीव प्रीत जुळनां
सारी इस्कटून जिंदगी मी पाहीली
तरी झाली कुठं चूक मला कळनां