menu-iconlogo
huatong
huatong
가사
기록
जीव कासावीस झाला

श्वास हा अडला जरी

दाटला अंधार अन्

संपला रस्ता जरी

श्वास अडलेल्या मनाला

मित्र ठोक्यासारखा

मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा..

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

हो ओ ओ वाट चुकणार नाही जीवनभर तुझी

वाट चुकणार नाही जीवनभर तुझी

एक तू मित्र कर आरशासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

आत्महत्याच करणार नाही कोणी,

आत्महत्याच करणार नाही कोणी..

मित्र असला जवळ जर मनासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

ओSssमैत्री चाटते गाय होऊन मना,

मैत्री चाटते गाय होऊन मना,

जा बिलगून तू तिला वासरासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

ओSssदुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

ओSssका उगा हिंडतो देव शोधायला?

का उगा हिंडतो देव शोधायला

मित्र आहे जवळ मंदिरासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

ओSssदुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

दृष्ट लागू नये वेदनेची तिला

दृष्ट लागू नये वेदनेची तिला

ओSssमित्र डोळ्यातल्या काजळासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

ओSssदुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

जाळताना मला देह ठेवा असा..

ओSssजाळताना मला देह ठेवा असा

हात खांद्यावरी टाकल्यासारखा

हात खांद्यावरी टाकल्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा

आरशाच्या सारखा बस मित्र असला पाहिजे

जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे

अंतराळी एकटा तो राहतो ईश्वर कसा ?

गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे,

गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे..

ajay gogawale/APURVA의 다른 작품

모두 보기logo