श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
स्वर- अजित कडकडे
***
(M) नि:शंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
(Ch) अशक्य ही शक्य करतील स्वामी
***
shri swami samarth tarak mantra...
***
(M) जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी
(Ch) अशक्य ही शक्य करतील स्वामी
***
भिऊ नकोस मी पाठीशी आहे...
***
(M) उगाची भितोसी भय हे पळू दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी
(Ch) अशक्य ही शक्य करतील स्वामी
***
enjoy devotional singing...
***
(M) खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी
(Ch) अशक्य ही शक्य करतील स्वामी
***
sing with ur heart...
***
(M) विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात
हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
न सोडति तया जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी
(Ch) अशक्य ही शक्य करतील स्वामी
***
विजयराजे_भोसले