menu-iconlogo
logo

Choricha Mamla

logo
가사
चोरीचा मामला, मामा ही थांबला

चोरीचा मामला, मामा ही थांबला

प्रेमानं दे हात हाती

तूच माझी मैना, करू नको दैना

या इश्काच्या गोड-गोड राती, हो

रात सारी आपली, घाई नाही चांगली

रात सारी आपली, घाई नाही चांगली

तुम्ही माझ्या जन्माचे साथी

थोडा वेळ बसा, जरा कळं सोसा

या प्रीतीच्या धुंद-धुंद राती, हो

येना राणी, तू येना

ना, ना राजा, ना, ना, ना

दूर अशी तू राहू नको, प्रीत अधूरी ठेऊ नको

रात नशीली, तू ही रसीली, मदनाचा सुटलाय वारा

आस जीवाला लाऊ नको, ध्यास असा हा घेऊ नको

प्रेम दीवाना का रे उभा हा? प्रीतीचा लागलाय नारा

येना राणी, तू येना

ना, ना राजा, ना, ना, ना

वेड तुझे रे आहे मला, hmm, सांगू कशी मी वेड्या तुला?

गंधबसंती मिलन राती लाजेनं चुर मी झाले

प्रीत फुला तू लाजु नको, भीड अशी ही घेरू नको

धुंद जवानी, ताल-सुरानी मदहोश जग हे झाले

येना राजा, तू येना

ना, ना राणी, तू येना

चोरीचा मामला, मामा ही थांबला

हा, चोरीचा मामला, मामा ही थांबला

प्रेमानं दे हात हाती

तूच माझी मैना, करू नको दैना

या इश्काच्या गोड-गोड राती, हो

रात सारी आपली, घाई नाही चांगली

रात सारी आपली, घाई नाही चांगली

तुम्ही माझ्या जन्माचे साथी

थोडा वेळ बसा, जरा कळं सोसा

या प्रीतीच्या धुंद-धुंद राती, हो

येना राणी, तू येना

येना राजा, तू येना, हा