menu-iconlogo
huatong
huatong
avatar

PAHA PAHA MANJULA BHEEMGEET

Ganeshhuatong
oakden1971huatong
가사
기록
हे खरंच आहे खरं

श्री भीमराव रामजी आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर

महाविरोध कवटाळीला

सारा समाज सांभाळीला

कोटीकोटीचा उद्धार केला हो

शिरी बांधीला मानाचा शेला

अंधरूढीला गुलामगिरीला

अंधरूढीला गुलामगिरीला

लावलिया कातर,लावलिया कातर

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर

जातीभेदाच्या तोडिल्या तोफा

मार्ग सत्याचा दाविला सोपा

आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो

बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा

जाणून महती सुखानं जगती

जाणून महती सुखानं जगती

दलितांची लेकरं,दलितांची लेकरं

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर

भारताला जी होती हवी

अशी लिहिली घटना नवी

नवज्ञानाचा होता रवी हो

काय वर्णावी ही थोरवी

जोवर धरती हरेंद्रा कीर्ती

जोवर धरती हरेंद्रा कीर्ती

राहील अजरामर,राहिल अजरामर

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर

हे खरंच आहे खरं

हे खरंच आहे खरं

श्री भीमराव रामजी आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर

नाव हे गाजतंय हो जगभर

Ganesh의 다른 작품

모두 보기logo