गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय !
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
नाय !
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्याच मासोली झालं
माझ्या प्रीतीचा,
सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा,
जा रं गुमान साळसूद चोरा
रं नगं दावूस भलताच तोरा,
जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला,
अशी मी भुलणार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
नाय !
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
नायsss !
रं माझ्या रूपाचा ऐना,
तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना,
तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी, जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला,
अशी मी गावणार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार
हाsssय !
आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय !
तुझ्या पिरतिचि रानी मी होनार हाय !
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय !