menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Sadgurunatha

Mangesh Borgaonkarhuatong
nyyankees509huatong
가사
기록
सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु

ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू

सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।

ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू

निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ

ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु

सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु

ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू

उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू

बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ

सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु

ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू

कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू

करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू

सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु

ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू

अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू

निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू

सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु

ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू

Mangesh Borgaonkar의 다른 작품

모두 보기logo