काय ग सखु बोला दाजीबा
काय ग सखु बोला दाजीबा
काय ग सखु काय ग सखु
बोला दाजीबा अहो बोला दाजीबा
काय ग सखु बोलू का नकु
घड़ीभर जराशी थांबशील कां थांबशील कां
गोड गोड माझ्याशी बोलशील कां
काय ग सांगू बाई लई मला घाई
दाजीबा थांबायला येळच न्हाई
येळच न्हाई
दाजीबा थांबायला येळच न्हाई
डोईवर घेऊन चाललीस काई
डोईवर पाटी डोईवर पाटी पाटित भाकरी
भाकरीवर तांब्या तांब्यात दूध हाय गाईचं
गाईचं व घेता का दाजीबा वाईचं दूध
गाईचं व घेता का दाजीबा वाईचं
काय ग सखु बोला दाजीबा
काय ग सखु बोला दाजीबा
आड वाट जाऊ नको पाठ पाठ फिरू नको
लाडीगोडी डाऊ नको घरला जा
लई वंगाळ बाई हिचा राग ठावा न्हाई
अरं जा जा जा जा जा
काय ग सखु काय ग सखु
बोला दाजीबा अहो बोला दाजीबा
काय ग सखु रागवू नकु
घड़ीभर जरा थांबशील कां थांबशील कां
जातीस कुठ तू सांगशील कां
रानाच्या वाटं घेताय भेट
दाजीबा तुमच वागणंच खोटं
वागणंच खोटं
पहाटेच्या पारी तूं चललीस कुठं
पहाटेच्या पारी पहाटेच्या पारी
घेऊन न्याहरी पायी लवकरी
जाते मी पेरुच्या बागात
बागात व येऊ नका दाजीबा रागात
जाते बागात व येऊ नका दाजीबा रागात
काय ग सखु बोला दाजीबा
काय ग सखु बोला दाजीबा
आड वाट जाऊ नको पाठ पाठ फिरू नको
लाडीगोडी डाऊ नको घरला जा
लई वंगाळ बाई हिचा राग ठावा न्हाई
अरं जा जा जा जा जा
काय ग सखु काय ग सखु
बोला दाजीबा अहो बोला दाजीबा
काय ग सखु घाबरू नकु
घड़ीभर जरा थांबशील कां थांबशील कां
मनातं काय तुझ्या सांगशील कां
सांगू कशी मी बाई कसचं होतं
मनातं माझ्या भलतंच येतं
भलतंच येतं मनातं माझ्या भलतंच येतं
काय ग सखु तुझ्या मनातं येतं
दुखतयां कुठं
दुखतयां कुठं कळंना नीट
लाज मला वाटं
दाजीबा तुम्हाला माहित
माहित व जायचं का आमराईत
चल ग सखु चल ग सखु
जावा दाजीबा
अहो जावा दाजीबा