menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Gau Nako Kisana( गाऊ नको किसना -महाराष्ट्र शाहीर)

Jayesh Khare/ajay gogawalehuatong
GANESHDHOTEPATILhuatong
Lirik
Rakaman
(यमनेच्या काठी निघाल्या

गवळणी साऱ्या पाण्याला

अन् म्हंती सांग यसोदे

काय करावं कान्ह्याला)

घागरी फोडून जातुया

दही दूध चोरून खातुया

येसोदे आवर त्याला

घोर जीवाला फारऽ

ग्वाड लै बोलून छळतोया

द्वाड लै छेडून पळतोया

सावळा पोर तुझा हा

रोज करी बेजारऽ

त्येला समजावून झालं

कैकदा कावून झालं

(तुझी नाही धडगत आता

इकडं राहू नको)

(हे गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..

गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..

गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..

गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..)

गायक:- जयेश खरे,मयुर सुकळे,अजय गोगावले

गीत:- गुरू ठाकूर

((सये पाखरू रानाचं देतंया सांगावा

वाट माहेराची साद घालते

सय दाटते दाटते पंचमी सणाला

गंगा यमुना गं डोळी नाचते))

नाग पंचमीचा आला सण

पुन्याईचं मागू दान

किर्पा तूझी आम्हावर राहू दे

आज वाण हिरव्या चुड्यानं

कुकवाचं मागू लेनं

औक्ष धन्या लेकराला लागू दे

दृष्ट ना लागो कुणाची

ऱ्हाऊ दे साथ सुखाची

(हे आड बाजुला लपजा

तोंड बी दावू नको)

(हे गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..

गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..

गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..

गाऊ नको रे गाऊ नको गाऊ

किसना गाऊ नको गाऊ नको ना..)

हं हं हं....हं हं हं

हं हं हं....हं हं हं

हं हं हं....हं हं हं

(गोकुळात रंग खेळतो

रंग खेळतो श्रीहरी

गोकुळात रंग खेळतो

रंग रंग खेळतो श्रीहरीऽऽ

हा हा हा हा)

गोकुळात रंग खेळतो

रंग खेळतो श्रीहरी

मोहनात दंग राधिका

दंग राधिका भाबडी

लावीतो लळा.....

श्याम सावळा.....

लागला तुझा....

रंग हा निळा....

सूर बासरीचा मोहवी मनाला

बासरीत या....

जीव गुंतला....

सोडवू कसा रे सांग मोहना

जीव प्राण होऊन कान्हा

श्याम रंग लावून कान्हा

सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको...

(जाऊ नको रे जाऊ नको किसना जाऊ नको जाऊ नको ना..

जाऊ नको रे जाऊ नको किसना जाऊ नको जाऊ नको ना..

जाऊ नको रे जाऊ नको किसना जाऊ नको जाऊ नको ना..

जाऊ नको रे जाऊ नको किसना जाऊ नको जाऊ नको ना..

जाऊ नको रे जाऊ नको किसना जाऊ नको जाऊ नको ना..

जाऊ नको रे जाऊ नको किसना जाऊ नको जाऊ नको ना....)

ट्रॅक सौजन्य -गणेश धोटे पाटील

Gau Nako Kisana( गाऊ नको किसना -महाराष्ट्र शाहीर) oleh Jayesh Khare/ajay gogawale - Lirik dan Liputan