menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Kama purta Mama कामा पुरता मामा

Sudhir Phadke/Krishna Kallehuatong
रविझांबरे💕सुरगंध💕🌷🌷huatong
Lirik
Rakaman
(तो) कामापुरता मामा,ताकापुरती आजी

जोवर पुरवू हट्ट तोवरी,पत्नी असते राजी

(ती) कामापुरता मामा,ताकापुरती आजी

जोवर पुरवू हट्ट तोवरी,पत्नी असते राजी

(दोघे)कामापुरता मामा,हो मामा,हो मामा

*सौजन्य-रविंद्र झांबरे*

(तो) मित्र म्हणोनि जवळ कराया

कोणी योग्य दिसेना

तुटून पडते नाण्यावरती सारी वानरसेना

सारी वानरसेना

(दोघे)तोंडापुरती गोडी,पाठीवर चहाडी

तोंडापुरती गोडी,पाठीवर चहाडी

पैशावाचून वैद्य बघेना,पिडलेल्याची नाडी

कामापुरता मामा,हो मामा,हो मामा

¤

(ती)लग्नाआधी जावई मागे,जागा संसाराला

पैशावाचून फुटे न अंकुर,प्रेमाच्या बीजाला...

लग्नाआधी जावई मागे,जागा संसाराला

पैशावाचून फुटे न अंकुर,प्रेमाच्या बीजाला

प्रेमाच्या बीजाला

(दोघे)नाती ना रक्ताची,विरघळत्या मेणाची

नाती ना रक्ताची,विरघळत्या मेणाची

काका, मामा,बंधू,भगिनी

सगळी हो स्वार्थाची

कामापुरता मामा,हो मामा ,हो मामा

¤

(तो)पैसा असता मान-मरातब,

सलाम करतील सारे

अधनावस्था पाहून म्हणतील,

दूर निघोनि जा रे

दूर निघोनि जा रे

(दोघे)हात करावा ओला,तेव्हा पुढचं बोला

हात करावा ओला,तेव्हा पुढचं बोला

गरिबासाठी येतील का ती,

त्याला कुणीही टोला

कामापुरता मामा,ताकापुरती आजी

जोवर पुरवू हट्ट तोवरी,पत्नी असते राजी

कामापुरता मामा,हो मामा,हो मामा

Lebih Daripada Sudhir Phadke/Krishna Kalle

Lihat semualogo