menu-iconlogo
huatong
huatong
arun-date-yeshil-yeshil-rani-cover-image

Yeshil Yeshil Rani

Arun Datehuatong
mmaryanne2003huatong
Letra
Gravações
येशिल येशिल येशिल राणी;

पहाटे पहाटे येशिल?

येशिल येशिल येशिल राणी;

पहाटे पहाटे येशिल?

तुझिया माझिया प्रेमाची पावती

साखर चुंबन देशिल?

येशिल येशिल येशिल राणी;

पहाटे पहाटे येशिल?

तुझिया माझिया प्रेमाची पावती

साखर चुंबन .. देशिल?

येशिल? येशिल? येशिल?

ओलेती पहाट शहाऱ्याची लाट

गळ्यात रेशमी बाहू

तुझी हनुवटी जरा उचलता

नको ना रागाने पाहू

ओलेती पहाट शहाऱ्याची लाट

गळ्यात रेशमी बाहू

तुझी हनुवटी जरा उचलता

नको ना रागाने पाहू

प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत

मिठीत मिटून. . जाशिल ?

येशिल येशिल येशिल राणी;

पहाटे पहाटे येशिल?

तुझिया माझिया प्रेमाची

पावती साखर चुंबन.. देशिल?

येशिल? येशिल? येशिल?

चंद्र मावळेल वाट दाखवेल

शुक्राचा टपोरा तारा

चंद्र मावळेल वाट दाखवेल

शुक्राचा टपोरा तारा

शुक्राचा टपोरा तारा

कोवळ्या क्षणाचे जपून लक्षण

सांगेल कोवळा वारा

भानात नसून गालात हसून

ललाट चुंबन. . घेशिल ?

येशिल येशिल येशिल राणी;

पहाटे पहाटे येशिल?

तुझिया माझिया प्रेमाची

पावती साखर चुंबन.. देशिल?

येशिल? येशिल? येशिल?

वाजता पाऊल घेईल चाहूल

जाळीत चोरटा पक्षी

वाजता पाऊल घेईल चाहूल

जाळीत चोरटा पक्षी

जाळीत चोरटा पक्षी

कोणाला दिसेना, असू दे असेना,

मीलना एखादा साक्षी

धुक्याने दोघांना झाकून टाकता

मुक्याने माझी तू. .होशिल ?

येशिल येशिल येशिल राणी;

पहाटे पहाटे येशिल?

तुझिया माझिया प्रेमाची

पावती साखर चुंबन. .

देशिल?.. देशिल? .. देशिल?

Mais de Arun Date

Ver todaslogo