काय सांगू राणी मला गाव सुटंना
कसं सांगू राणी मला गाव सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
कसं सांगू राणी मला गाव सुटंना
बंद गळ्यामंदी माझं मावंना गं अंग
जीनच्या कापडामंदी दुनिया झाली कशी तंग
जो तो हाय राणी आपल्या धुंदीमधी दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
कसं सांगू राणी मला गाव सुटंना
हो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ...
पारी आली सरी गेली झाली त्याची तारी
पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी
हितं म्हातारीच्या डोईवरला पदर हटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
कसं सांगू राणी मला गाव सुटंना
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती
ओल्याचिंब पावसात ओलीचिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का गं राती
सर्जा राजाची गं जोडी मागं हटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
कसं सांगू राणी मला गाव सुटंना
गावाकडची माणसं आमची कशी साधीभोळी
प्रेमाच्या या रंगामंदी रंगते आमची होळी
दिवाळीच्या सणामंदी जमली मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरणपोळी
चुलीवरल्या भाकरीची चवही सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
हो शहरातली पोरं कशी साहेब झाली
गावाकडली पोरं आता पाराखाली आली
मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली
राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली
शांतेचं कार्टं अजून दहावी सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
काय सांगू राणी मला गाव सुटंना
कसं सांगू राणी मला गाव सुटंना
हो ओ ओ हो ओ ओ हो ओ ओ हो ओ ओ...