menu-iconlogo
huatong
huatong
Letra
Gravações
लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा?

डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा?

मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा?

मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा?

हे प्रश्न जीव घेणे,

हे प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे

हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे

तिरपा कटाक्ष भोळा, आऽऽआऽऽऽआऽऽऽ

तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा

देशातुनी फुलांचा आणी सुगंधवारा

देशातुनी फुलांचा आणी सुगंधवारा

रात्रीच चांदण्यांचे….

रात्रीच चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

Mais de Hridaynath Mangeshkar

Ver todaslogo

Você Pode Gostar