जसं जीवात जीव घुटमळं 
तसं पिरतीचं वाढतंय बळ 
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गं 
न हे बघून दुश्मन जळं 
वर ढगाला लागली कळ 
पाणी थेंब थेंब गळं 
ढगाला लागली कळ 
पाणी थेंब थेंब गळं 
वर ढगाला लागली कळ 
पाणी थेंब थेंब गळं 
चल ग राणी गाऊया गाणी 
फिरुया पाखरासंगं 
रामाच्या पाऱ्यात गारगार वाऱ्यात 
अंगाला भिडू दे अंग 
हे जवा तुझं नि माझं जुळं 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस) 
सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा 
कुठं हा घेऊन जावा 
काय बाय अकरित झालंय विपरित 
सशाला वाट कूणी दावा 
माझ्या पदरात पडलंय खूळं 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस) 
जमीन आपली उन्हानं तापली 
लाल लाल झालीया माती 
करूया काम अन् गाळूया घाम 
चला पिकवू माणिक मोती 
एका वर्सात होईल तीळं 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस) 
शिवार फूलतय तोऱ्यात डूलतय 
झोक्यात नाचतोय धोतरा 
तूरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा 
लपलाय भुईमूग भितरा 
मधी वाटाणा बघ वळवळं 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस) 
झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल 
वराडतिया कोकिळा 
चिमणी झुरते उगीच राघू मैने वरती खुळा 
मोर लांडोरी संगं खेळं 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस) 
थूईथूई नाचतय खुशीत हसतय 
मनात फुलपाखरू 
सोडा की राया नाजूक काया 
नका गुदगुल्या करु 
तू दमयंती मी नळ 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस) 
बामनाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात 
येशिल का संध्याकाळी 
जाऊ दुसरीकडं नग बाबा तिकडं 
बसलाय संतू माळी 
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस) 
आलोय फर्मात पडलोय पिर्मात 
सांग मी दिसतोय कसा? 
सांगू?आडानी ठोकळा मनाचा मोकळा 
पांडू हवालदार जसा 
तुझ्या वाचून जीव तळमळं 
पाणी थेंब थेंब गळं 
(कोरस)