
Shona
नकळत हे झाले असे अन्
मन जुळले माझे तुझे
दरवळतो प्रेमाचा मौसम
जग हसरे माझे तुझे
अनोळखी वाटेवरी
भान हरवले जरी
शहारल्या क्षणातही
तोल सावरताना
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
अबोल स्वप्नांचे
तरंग उठताना
ये बोलुया डोळ्यातुनी
तुझ्या इशाऱ्याने
उनाड वारा ही
खुणावतो भासांतुनी
जिथे जिथे फिरे नजर
तुझा असर तुझा बहर
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
मनातले सारे
ओठांवरी आले
हुरहूर ही लागे नवी
सुगंध श्वासांचा
श्वासांत भरताना
मिठी जणू उमलावी
तुझ्यात मी माझ्यात तू
पुकारतो नवा ऋतू
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना
ये ना शोना ये ना