(नभ हे भरून बरसावं, रान हे खुलून बहरावं)
(मन हे अजून मोहरावं, सख्या रे)
(दिस-रात माझ्या संग तुझ्या पिरतीचा गंध)
(अन धुंद-धुंद व्हावं, सख्या रे)
नातं नव-नव, सपानं नव
प्रेम ही नव-नव, सुख ही नव
नातं नव-नव, सपानं नव
प्रेम ही नव-नव, सुख ही नव
नभ हे भरून बरसावं, रान हे खुलून बहरावं
मन हे अजून मोहरावं, सख्या रे
रूप तुझं गं जस हिरवं शिवार
सोन्यानं भरलंया घरदार सारं
तुझ्यासाठी वाहिलं रं तनमन सारं
जीव लावुनिया करू सुखाचा संसार
नभ हे भरून बरसावं, रान हे खुलून बहरावं
मन हे अजून मोहरावं, सखे गं
दिस-रात माझ्या संग तुझ्या पिरतीचा गंध
अन धुंद-धुंद व्हावं, सख्या रे
तुझ्या संगतीनं दिस आनंदात ऱ्हाहती
सोनेरी उन्हात क्षण उजळून जाती
साथ राहू दे अशीच हात दे गं हाती
कष्टाचं बीज पेरू पिकतील मोती