गीतकार : मंगेश पाडगांवकर 
गायक : सुधीर फडके 
संगीतकार : यशवंत देव 
तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी 
 शुभ्र तुरे माळून आल्या 
निळ्या निळ्या लाटा 
रानफुले लेवून सजल्या 
या हिरव्या वाटा 
शुभ्र तुरे माळून आल्या 
निळ्या निळ्या लाटा 
रानफुले लेवून सजल्या 
या हिरव्या वाटा 
या सुंदर यात्रेसाठी 
या सुंदर यात्रेसाठी 
मला जाऊ दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी 
 Interlude  
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी 
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी 
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी 
वाजती सतारी 
सोहळयात सौंदर्याच्या 
सोहळयात सौंदर्याच्या 
तुला पाहु दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी 
 शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे 
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे 
तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे 
गंध धुंद वारे 
चांदण्यात आनंदाच्या 
आआऽऽऽऽऽ 
चांदण्यात आनंदाच्या 
मला न्हाऊ दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी