menu-iconlogo
huatong
huatong
jaywant-kulkarni-hi-chaal-turu-turu-cover-image

Hi Chaal Turu Turu

Jaywant Kulkarnihuatong
เนื้อเพลง
บันทึก
ही चाल तुरुतुरु

उडती केस भुरुभुरु

डाव्या डोळ्यांवर बट्टा ढळली

जशी मावळत्या उन्हात

केवड्याच्या बनात

नागीन सळसळली ! २ !

इथ कुणी आसपास ना

डोळ्यांच्या बोनात हास ना

तु जरा मा़झ्याशी बोल ना

ओठांची मोहर खोलना

तु लगबग जाता

माग वळुन पाहता

वाट पावलात अडखळली

जशी मावळत्या उन्हात

केवड्याच्या बनात नागीन सळसळली !

उगाच भुवयी ताणुन उगाचा रुसवा

पदर चाचपुण हाताण

ओंठ जरा दाबीशी दातान

हा राग जीवघेना होता

खोटा तो बहाना

आता माझी मला भुल कळली

जशी मावळत्या उन्हात

केवड्याच्या बनात नागीन सळसळली !

ही चाल तुरुतुरु

उडती केस भुरुभुरु

डाव्या डोळ्यांवर बट्टा ढळली

जशी मावळत्या उन्हात

केवड्याच्या बनात नागीन सळसळली !

เพิ่มเติมจาก Jaywant Kulkarni

ดูทั้งหมดlogo