गेला हरी कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घुमेन गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा..
उडतो डोळा डोळा बाई डावा..
गेला हरी कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घुमेन गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा..
उडतो डोळा डोळा बाई डावा..
रमती कुंजवनी बाला,
असावा तिथे नंदलाला,
कुणी जा आणा मुकुंदाला,
जीव हा वेडापिसा झाला,
हरीचा शोध कुणी लावा.
ग उडतो डोळा डोळा बाई डावा...
उडतो डोळा डोळा बाई डावा...
कुणाशी केला जरी दंगा ,
मला येऊन जणी सांगा ,
त्यास दाखवीन मी इंगा ,
नको पण लपवू श्रीरंगा ,
माजा श्याम मला दावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा ...
उडतो डोळा डोळा बाई डावा ...
कधी ना झाली आजवरती,
ग नजरेआड कृष्णमूर्ती,
असता गोप सदा भवती,
कशी मग पडली भूल पूर्ती ,
हरीचा किती करू धावा.
ग उडतो डोळा डोळा बाई डावा ...
उडतो डोळा डोळा बाई डावा ...
राधा घरात जर नाही ,
कुणी जा, संजयास पाही ,
वडा खाली यमुने डोही ,
धरुनी अनगे लावालावी,
त्याचा काढला कृष्णकावा.
ग उडतो डोळा डोळा बाई डावा ...
उडतो डोळा डोळा बाई डावा ...
गेला हरी कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घुमेन गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा..
उडतो डोळा डोळा बाई डावा..
उडतो डोळा डोळा बाई डावा..