menu-iconlogo
huatong
huatong
suman-kalyanpur-omkar-pradhan-roop-ganeshache-cover-image

Omkar Pradhan Roop Ganeshache

Suman Kalyanpurhuatong
sandgalinhuatong
เนื้อเพลง
บันทึก
ॐकार.. प्रधान.. रूप गणेशाचे

ॐकार प्रधान रूप गणेशाचे

हे तिन्ही देवांचे जन्म स्थान

ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।।धृ।।

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु

मकार महेश जाणियेला

ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।।१।।

ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न

ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न

तो हा गजानन मायबाप

ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।।२।।

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी

पहावी पुराणी व्यासाचिया

ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।।३।।

हे तिन्ही देवांचे जन्मस्थान

ॐकार प्रधान रूप गणेशाचे

เพิ่มเติมจาก Suman Kalyanpur

ดูทั้งหมดlogo