menu-iconlogo
logo

Tui Chander Aalo

logo
เนื้อเพลง
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,

आरास ही ताऱ्यांची.... गगनात तुझ्यासाठी,

हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,

आरास ही ताऱ्यांची.... गगनात तुझ्यासाठी,

कैपाक अशावेळी, मज याद तुझी आली......

ये ना.....

मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू,

थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू,

अनुरागी रसरंगी होऊन ये तू,

नाजुकशी एक परी होऊन ये तू …

वर्षाव तुझ्या तारुण्याचा,

रिमझिमता माझ्यावरी होऊ दे.....

रेशीम तुझ्या लावण्याचे,

चंदेरी माझ्यावरी लहरू दे......

नाव तुझे माझ्या ओठावर येते,

फूल जसे कि फूलताना दरवळते.....

इतके मज कळते, अधुरामी येते,

चांदरात ही बघ नीसटून जाते....

बांधिन गगनास झुला,

जर देशील साथ मला.....

ये ना.....

मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू,

थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू,

अनुरागी रसरंगी होऊन ये तू,

नाजुकशी एक परी होऊन ये तू …