menu-iconlogo
logo

Deva Tuzya Gabharyala

logo
Şarkı Sözleri
देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ

सांग कुठ ठेवू माथा कळनाच काही

देवा कुठ शोधू तुला मला सांग ना

प्रेम केल एवढाच माझा रे गुन्हा

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी

हे आरपार काळजात का दिलास घाव तू

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ..…

का कधी कुठे, स्वप्न विरले , प्रेम हरले

का कधी कुठे, स्वप्न विरले , प्रेम हरले

स्वप्न माझे आज नव्याने फुलले

अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

आरपार काळजात का दिलास घाव तू

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग

लागु दे तुझ्या उरी ……।

का रे तडफड हि ह्या काळजामधी ,

घुसमट तुझी रे होते का कधी

माणसाचा तू जन्म घे

डाव जो मांडला , मोडू दे…

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे

उत्तराला प्रश्न कसे हे पडले

अंतराचे अंतर कसे न कळले …।

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी

हे आरपार काळजात का दिलास घाव तू

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ..…

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी

हे आरपार काळजात का दिलास घाव तू

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू .

Aadarsh Shinde, Deva Tuzya Gabharyala - Sözleri ve Coverları