menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Ek Lajra N Sajra Mukhada

Arun Sarnaik/Usha Mangeshkarhuatong
विजयराजे_भोसलेhuatong
Şarkı Sözleri
Kayıtlar
***

(M) एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

(F) राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

(M) ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं

(F) लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

(M) नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

(F) हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

(M) का ?

(F) बगत्यात

(M) एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

(F) राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

***

चित्रपट- चंदनाची चोळी अंग अंग जाळी

गीतकार- जगदीश खेबुडकर

Sing with ur heart…

विजयराजे_भोसले

***

(F) रेशीम विळखा घालून सजणा

नका हो कवळून धरू

(M) का?

(F) लुकलुक डोळं करून भोळं

बगतंय फुलपाखरू

(M) कसा मिळावा पुन्हा साजणी

मौका असला गं

(F) लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

(M) नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

(F) हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

(M) का ?

(F) बगत्यात

(M) एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

(F) राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

***

संगीतकार- राम कदम

Its ur voice…

Its ur choice…

विजयराजे_भोसले

***

(F) डोळं रोखून थोडं वाकून

झुकू नका हो पुढं

(M) का ?

(F) गटर्गुम गटर्गुम करून कबुतर

बघतंय माझ्याकडं

(M) लई दिसानं सखे आज ह्यो

धागा जुळला गं

(F) लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

(M) नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

(F) हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

(M) का ?

(F) बगत्यात

(M) एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

(F) राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

***

स्वर- अरुण सरनाईक, उषा मंगेशकर

Thnx for song selection

विजयराजे_भोसले

***

(F) बेजार झाले सोडा सजणा

शिरशिरी आली अंगा

(M) का ?

मधाचा ठेवा लुटता लुटता

बघतोय चावट भुंगा

(M) मनात राणी तुझ्या कशाचा

झोका झुलला गं

(F) लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

(M) नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

(F) हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

(M) का ?

(F) बगत्यात

(M) एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

(F) राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

Follow me…

विजयराजे_भोसले

Arun Sarnaik/Usha Mangeshkar'dan Daha Fazlası

Tümünü Görlogo
Arun Sarnaik/Usha Mangeshkar, Ek Lajra N Sajra Mukhada - Sözleri ve Coverları