menu-iconlogo
logo

Haluch Ya Ho

logo
Şarkı Sözleri
हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या

गोड सकाळी ऊन पडे

आनंदाचे पडति सडे

गोड सकाळी ऊन पडे

आनंदाचे पडति सडे

हिरव्या पानांतुन वरती

येवोनी फुललो जगती

हिरव्या पानांतुन वरती

येवोनी फुललो जगती

हृदये अमुची इवलीशी

परि गंधाच्या मधि राशी

हासुनि डोलूंनी

हासुनि डोलूंनी

देतो उधळुन

सुगंध या तो सेवाया पण

हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या

कधि पानांच्या आड दडू

कधि आणू लटकेच रडू

कधि पानांच्या आड दडू

कधि आणू लटकेच रडू

कधि वार्‍याच्या झोताने

डोलत बसतो गमतीने

कधि वार्‍याच्या झोताने

डोलत बसतो गमतीने

तर्‍हेतर्‍हेचे रंग किती

अमुच्या या अंगावरती

निर्मल सुंदर

निर्मल सुंदर

अमुचे अंतर

या आम्हांला भेटाया पण

हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या

हळूच या हो हळूच या हळूच