menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Mee Tar Bholi Adani Thakoo

Usha Mangeshkar/Jaywant Kulkarnihuatong
ngilbhuatong
Şarkı Sözleri
Kayıtlar
मी तर भोळी अडाणी ठकू

तुमच्या नावाचं लाल-लाल कुकू

न कपाळी सोभल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

भलतचं काम तू लावलस मला

बोलून बगतोय मी सायबाला

ते लायनीत घेत्याल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

तुमची किरत मोठी, तुम्ही मनात लय दिलदार

तुमची किरत मोठी

आहो, तुमच्या साठी आले सोडून मी घरदार

आहो, तुमच्यासाठी

व्हतं-नव्हतं ते दिलय तुम्हाला आनी काय लागलं का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

सांगून ठेवलयं वाड-वडलांनी

काय झालं तरी एका हातानं

टाळी वाजल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

मी लाडात रुसले, लाडा-लाडात पुढ्यात घ्याल का?

मी लाडात रुसले

मी गालात हसले, माझ्या गालाला गाल तुमी द्याल का?

मी गालात हसले

मनात तुमच्या काय घुटमळतय कानात सांगाल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

तुझा न माझा हा जमलाय जोड

पगार माझा हा लय गं थोडा

न तेवढ्यात भागलं का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का?

Usha Mangeshkar/Jaywant Kulkarni'dan Daha Fazlası

Tümünü Görlogo
Usha Mangeshkar/Jaywant Kulkarni, Mee Tar Bholi Adani Thakoo - Sözleri ve Coverları