menu-iconlogo
logo

Tula pahate re

logo
avatar
Asha Bhosale/Marathi Songlogo
रविझांबरे💕सुरगंध💕🌷🌷logo
ایپ میں گائیں
بول
तुला पाहते रे तुला पाहते

तुला पाहते रे तुला पाहते

तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते

*स्वर-आशा भोसले*

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे

तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे..

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे

तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे

तुझ्या गायकीने सुखी नाहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते

*चित्रपट-जगाच्या पाठीवर*

किती भाग्य या घोर अंधेपणीही

दिसे स्वप्‍न झोपेत जागेपणीही..

किती भाग्य या घोर अंधेपणीही

दिसे स्वप्‍न झोपेत जागेपणीही

उणे लोचनांची सुखे साहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते

*सौजन्य-रविंद्र झांबरे*

कधी भक्त का पाहतो ईश्वराला

नदी न्याहळी का कधी सागराला..

कधी भक्त का पाहतो ईश्वराला

नदी न्याहळी का कधी सागराला

तिच्यासारखी मी सदा वाहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते

तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते

धन्यवाद ?

जय महाराष्ट्र ???