साऱ्या खुणा हाती जुन्या
आलो तिथे फिरुनी पुन्हा
माझा होशील का?
एकदा माझा होशील का?
सख्या रे, माझा होशील का?
हो, साऱ्या खुणा हाती जुन्या
आलो तिथे फिरुनी पुन्हा
माझी होशील का?
एकदा माझी होशील का?
सखे गं, माझी होशील का?
सलतो का रे फुंकर वारा?
निसटून जाती क्षण हे पारा
चांदणं वेळा पांघरतांना
नकळत हाती येई निखारा
सूर मिळाले काहूर तरीही
जाणले तरी तू सांग ना
माझी होशील का?
एकदा माझी होशील का?
Hmm, सख्या रे, माझा होशील का?
Mmm, हरलो का रे जिंकून सारे?
दोन सह्या अन् जगणे कोरे
आठवणींचे गोठले वारे
ऊब जीवाला देवून जा रे
उसवून धागे जाऊ नको ना
जाता-जाता थांब ना
माझी होशील का?
एकदा माझा होशील का?
सख्या, माझा होशील का?
माझी होशील का?
माझी होशील का?
सख्या रे, माझा होशील का?
एकदा माझी होशील का?
हो, सख्या रे, माझा होशील का?