menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Mana Manav Va Parmeshwar

Sudhir Phadkehuatong
offthewall_starhuatong
Lời Bài Hát
Bản Ghi
माना मानव वा परमेश्वर

माना मानव वा परमेश्वर

मी स्वामी पतितांचा

भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

दैवजात दुःखाने मनुजा पराधीन केले

दैवजात दुःखाने मनुजा पराधीन केले

त्या पतितांचे त्या पतितांचे

केवळ रडणे मजला ना रुचले

भूषण रामा एकपत्निव्रत

भूषण रामा एकपत्निव्रत मला नको तसले

मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा

मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा

भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

रुक्मिणी माझी सौंदर्याची रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा

किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा

तरीही वरितो सहस्त्र सोळा आ आ आ

'तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला

पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा

पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा

भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

कर्तव्याला मुकता माणूस माणूस ना उरतो

कर्तव्याला मुकता माणूस आ आ आ

कर्तव्याला मुकता माणूस माणूस ना उरतो

हलाहलाते प्राशुन शंकर

हलाहलाते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो

जगता देण्या संजीवन मी

जगता देण्या संजीवन मी कलंक आदरितो

वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा

वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा

भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा

भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा

Nhiều Hơn Từ Sudhir Phadke

Xem tất cảlogo