menu-iconlogo
huatong
huatong
歌词
作品
पीश्यावाणी झालं रं

अर-र-र-र-र-र खुळ्या वाणी झालं रं

झुंझुर-मंझूर पहाटला टिपूर-टिपूर चांदणं

दिवस येडा गेला कुठं?

भिर-भिर नजरेला नाजूक-साजूक भास रं

दावून चांद सरला कुठं

बांधावर पाय हाती आभाळ घावतया

आपसूक वारा नवा उरात धावतया

पंखा बिगर जीव ह्यो उड रं

आव, पैंजण कानामधी छुनु-छुनु वाजतंय

डोळ्या म्होरं नजारा पण सपान वाटतंय

अर-र-र-र-र-र पैंजण कानामधी छुनु-छुनु वाजतेय

डोळ्याम्होरं नजारा पण सपान वाटतंय

असा कसा रंग आज गुलाबी उन्हाचा?

फुलावाणी गंध जणू पाचोळ्याला आला कसा?

कानावर हाक, जरी दूरवर नाही कुणी

डोळ्याम्होरं झाप आता झोप नाही ध्यानी-मनी

ओ, जीव खेळ नि लगोरी जीव

ओ, बघ झाला हाय टपोरी

मग गावभर हुंदाड, झिम-झिम झिम्माड

रुसलं, हसलं, फसलं रं

पीश्यावाणी झालं रं

अर-र-र-र-र-र खुळ्या वाणी झालं रं

झुंझुर-मंझूर पहाटला टिपूर-टिपूर चांदणं

दिवस येडा गेला कुठं?

भिर-भिर नजरेला नाजूक-साजूक भास रं

दावून चांद सरला कुठं

बांधावर पाय हाती आभाळ घावतया

आपसूक वारा नवा उरात धावतया

पंखा बिगर जीव ह्यो उड रं

आव, डोळ्या म्होरं नजारा पण सपान वाटतंय

更多AV Prafullachandra热歌

查看全部logo

猜你喜欢