menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Manachya dhundit lahrit ye na

Jaywant Kulkarnihuatong
neffa.mandahuatong
歌词
作品
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना

सखे ग साजणी ये ना

जराशी सोडून जनरीत ये ना

सखे ग साजणी ये ना

मनाच्या धुंदीत लहरीत ये ना

सखे ग साजणी ये ना

चांदणं रूपाचं आलंय भरा

मुखडा तुझा ग अति साजरा

माझ्या शिवारि ये तू जरा

चारा घालीन तुज पाखरा

माझे डोळे शिणले ग,तुझी वाट पाहुनी,

गsss ये ये ये ये

गुलाबी गालांत हासत ये ना

सखे ग साजणी ये ना

जराशी लाजत मुरडत ये ना

सखे ग साजणी ये ना

आता कुठवर धिर मी धरू

काळिज करतंय बघ हुरहुरू

सजणे नको ग मागे फिरू

माझ्या सुरांत सुर ये भरू

माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी,

गsss ये ये ये ये

बसंती वाऱ्यात, तोऱ्यात ये ना

सखे ग साजणी ये ना

सुखाची उधळीत बरसात ये ना

सखे ग साजणी ये ना

सखे ग साजणी ये ना

सखे ग साजणी ये ना

सखे ग साजणी ये ना

सखे ग साजणी

更多Jaywant Kulkarni热歌

查看全部logo