menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Swar Aale Duruni

Sudhir Phadkehuatong
sisqosgurl_02huatong
歌词
作品
स्वर आले दुरुनी

जुळल्या सगळ्या त्या आठवणी

स्वर आले दुरुनी

जुळल्या सगळ्या त्या आठवणी

स्वर आले दुरुनी

निर्जीव उसासे वार्‍यांचे,

आकाश फिकटल्या तार्‍यांचे

निर्जीव उसासे वार्‍यांचे,

आकाश फिकटल्या तार्‍यांचे

कुजबुजही नव्हती वेलींची,

हितगुजही नव्हते पर्णांचे

ऐशा थकलेल्या उद्यानी..

स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी

जुळल्या सगळ्या त्या आठवणी

स्वर आले दुरुनी

विरहार्त मनाचे स्मित

सरले, गालावर आसू ओघळले

विरहार्त मनाचे स्मित

सरले, गालावर आसू ओघळले

होता हृदयाची दो शकले

जखमेतुन क्रंदन पाझरले

घाली फुंकर हलकेच कुणी..

स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी

जुळल्या सगळ्या त्या आठवणी

स्वर आले दुरुनी

(पडसाद कसा आला न कळे)2,

अवसेत कधी का तम उजळे

पडसाद कसा आला न कळे,

अवसेत कधी का तम उजळे

संजीवन मिळता आशेचे

निमिषात पुन्हा जग सावरले

किमया असली का केलि कुणी..

स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी

जुळल्या सगळ्या त्या आठवणी

स्वर आले दुरुनी

更多Sudhir Phadke热歌

查看全部logo