menu-iconlogo
logo

Sanaicha Sur Kasa

logo
歌词
सनईचा सुर कसा

वाऱ्यानं धरला

ढगांचा ढोल घुमु लागला

बिजलीचा ताशा कसा

कडकड कडाडला

पाऊस सुरांचा

वर्षाव स्वागताला

सनईचा सुर कसा

वाऱ्यानं धरला

ढगांचा ढोल घुमु लागला

बिजलीचा ताशा कसा

कडकड कडाडला

पाऊस सुरांचा

वर्षाव स्वागताला

पाऊस सुरांचा

वर्षाव स्वागताला

आला आला आला

माझा गणराज आला

आला आला आला

माझा गणराज आला

मंगलमय अन तेजपुंज

गजाननाचे रूप

करुणासागर चैतन्याचे

हे ओंकार स्वरूप

दर्शनाने त्याच्या जाते

सर्व दैन्य दुःख

चिंता मुक्त होऊनिया

मिळे हर सुख

त्याच्या दर्शनाने माझा

जीव वेडा झाला

आला आला आला

माझा गणराज आला

आला आला आला

माझा गणराज आला

भक्तीमध्ये न्हाऊन

भक्त झाले ओले चिंब

गणेशाच्या भजनात

नाचण्यात दंग

सान थोर संग सारे

उडविती रंग

आनंदाच्या डोही फुले

आनंद तरंग

वाऱ्याचा सुगंध मंद

सांगे ज्याला त्याला

आला आला आला

माझा गणराज आला

आला आला आला

माझा गणराज आला

सनईचा सुर कसा

वाऱ्यानं धरला

ढगांचा ढोल घुमु लागला

बिजलीचा ताशा कसा

कडकड कडाडला

पाऊस सुरांचा

वर्षाव स्वागताला

सनईचा सुर कसा

वाऱ्यानं धरला

ढगांचा ढोल घुमु लागला

बिजलीचा ताशा कसा

कडकड कडाडला

पाऊस सुरांचा

वर्षाव स्वागताला

पाऊस सुरांचा

वर्षाव स्वागताला

आला आला आला

माझा गणराज आला

आला आला आला

माझा गणराज आला

Sanaicha Sur Kasa Swapnil Bandodkar - 歌词和翻唱