menu-iconlogo
logo

Chabidar Chabi

logo
歌词
अवं हे गाव लई न्यार

हितं थंड गार वारं

याला गरम शिणगार सोसंना...

chchorous याला गरम शिणगार सोसंना.

ह्याचा आदर्शाचा तोरा

ह्याचा कागद हाय कोरा

हितं शाहिरी लेखणी पोचंना

chchorous हितं शाहिरी लेखणी पोचंना

हितं वरणभाताची गोडी रं,

नको फुकट छेडाछेडी रं

का वो

अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला

साळसूद घालतोय् अळीमळी

अन सार वरपती, रसा भुरकती,

घरात पोळी अन भायेर नळी रंरंरंरंरंरं..

अगं चटकचांदणी, चतूर कामीनी

काय म्हनू तुला

तू हायेस तरी कोन ?

कोन ?

व्हय व्हय कोन

छबीदार छबी मी तोर्यात उभी (२)

जशी चांदणी चमचम नभी

अवं दाजिबा, गावात होईल शोभा,

हे वागणं बर नव्ह

अवं दाजिबा, गावात होईल शोभा,

हे वागणं बर नव्ह

chorous अवं दाजिबा, गावात होईल शोभा,

हे वागणं बर नव्ह

नवतीचं रान हे भवतीनं,

फिरत आले मी गमतीनं

बांधावरनं चालू कशी, पाठलाग हयो टाळू कशी

अरं लाजमोडया,भलत्याच करतोयस खोडया,

हे वागणं बर नव्ह

अरं लाजमोडया,भलत्याच करतोयस खोडया,

हे वागणं बर नव्ह

chorous अवं दाजिबा, गावात होईल शोभा,

हे वागणं बर नव्ह

डौल दावते मोराचा, तिरपा डोळा चोराचा

वडयाच्या काठाला अडीवतो

अंगावर पानी उडीवतो

अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा ,

हे वागणं बर नव्ह

अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा ,

हे वागणं बर नव्ह

chorous अवं दाजिबा, गावात होईल शोभा,

हे वागणं बर नव्ह

हिरवी शेतं दरवळली,

टपोरी कणसं मोहरली

शिळ घालुनी करतो खुणा, घडीघडीला चावटपणा

अरं मर्दा,अब्रूचा होईल खुर्दा

हे वागणं बर नव्ह

अरं मर्दा,अब्रूचा होईल खुर्दा

हे वागणं बर नव्ह

chorous अवं दाजिबा, गावात होईल शोभा

हे वागणं बर नव्ह

छबीदार छबी मी तोर्यात उभी (२)

जशी चांदणी चमचम नभी

अवं दाजिबा, गावात होईल

शोभा, हे वागणं बर नव्ह

अवं दाजिबा, गावात होईल

शोभा, हे वागणं बर नव्ह

Chabidar Chabi Usha Mangeshkar - 歌词和翻唱