menu-iconlogo
huatong
huatong
歌词
作品
उरामंदीं माया त्याच्या काळ्या मेघावानी

दाखविना कधी कुना डोळ्यातलं पाणी

झिजू-झिजू संसाराचा गाडा हाकला

व्हटामंदी हासू जरी कना वाकला

घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

मुकी-मुकी माया त्याची मुकी घालमेल

लेकराच्या पायी उभा जल्म उधळेल

आधाराचा वड जणू वाकलं आभाळ

तेच्याइना पाचोळा जीनं रानोमाळ

जीनं रानोमाळ

घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

किती जरी लावलं तू आभाळाला हात

चिंता तुझी मुक्कामाला तेच्या काळजात

वाच तेच्या डोळ्यातली कधी कासाविशी

तुझ्या पायी राबनं बी हाये त्याची ख़ुशी रं

त्याची ख़ुशी

घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

उमगाया बाप रं, उमगाया बाप रं

更多Vijay Narayan Gavande/Ajay Gogavale/Guru Thakur热歌

查看全部logo