menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Kunj Vanachi Sundar,Prabhat Geet कुंजवनाची सुंदर राणी

Ajay Gogavlehuatong
RavindraZambarehuatong
歌詞
作品
*स्वर-अजय गोगावले,बेला सुलाखे*

*चित्रपट-अगंबाई अरेच्चा*

*सौजन्य-रविंद्र झांबरे*

(तो) कुंजवनाची सुंदर राणी

रूप तुझे ग अंतर्यामी...

चांदणं राती अशा एकांती

मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी

(ती) लखलख चंदेरी आभाळ होते

माझ्या मनीही प्रीत जागते

प्रियतम भेटाया तुज आले मी...

कळलं का ?

(तो) कुंजवनाची सुंदर राणी

रूप तुझे ग अंतर्यामी...

चांदणं राती अशा एकांती

मनसागर उसळं मीलना~ची ऊर्मी

$$$$$

(ती) मेघसावळा माझा राया,

भोळा भाबडा माझा राया

माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया

माझा राया ग

मर्दानी छातीचा माझा राया,

मोठ्या मनाचा माझा राया

माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया

माझा राया ग

(तो) माझं काळीज तू, माझी हरणी,

तुझं रूप हे नक्षत्रावानी

ह्या संसाराला देवाजीची छाया~ग...

(ती) मेघसावळा माझा राया भोळा

भाबडा माझा राया

माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया,

माझा राया ग

$$$$$

(तो) आहाहाहाहा,(ती) आ आहाहाहाहाहा

(तो) आहाहाहाहा आहा ओहो होहोहो...

(ती)मन माझे उमलून गेले,स्पर्श तुझा झाला

मन माझे उमलून गेले,स्पर्श तुझा झाला

(तो)प्रीतिचा बहर बघ आला,हा वेड लावुनी गेला

प्रीतिचा बहर बघ आला

$$$$$

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला

तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला

(दोघे)प्रीतिचा बहर बघ आला,हा वेड लावुनी गेला

$$$$$

(तो) ऐ पोरी~थांब

(ती) मक्याच्या शेतात एकलीच होते

ठाऊक नव्हतं कुणा

(तो) असं .....हुर्रर्रर्र हा

(ती) आरं उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय

हाय कोन ह्यो पाहुणा

(तो)मी दाबून बघतुया कणसं

भरला हाय का दाणा

मी दाबून बघतुया कणसं

भरला हाय का दाणा हा

(ती) मक्याच्या शेतात एकलीच होते

ठाऊक नव्हतं कुणा

उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय

हाय कोन ह्यो पाहुणा

(तो)मी दाबून बघतुया कणसं

भरला हाय का दाणा

मी दाबून बघतुया कणसं

भरला हाय का दाणा हा

$$$$$

(ती) तुझ्या प्रीतित झाले खुळी,

तुझ्यावाचून न करमे मुळी

माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्‍नात तू,

तरी का रे सख्या दूर तू

सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

(तो) तुझ्या प्रीतित झालो खुळा,

छंद नाही मला वेगळा

माझ्या श्वासात तू,माझ्या स्वप्‍नात तू,

तरी का ग सखे दूर तू

सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग

(ती)सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

*धन्यवाद*

更多Ajay Gogavle熱歌

查看全部logo