menu-iconlogo
logo

Na Kalata Ase Oon

logo
歌詞
न कळता असे ऊन

(चित्रपट: आपली माणसं)

-: गायक :-

आशा भोसले,

सुरेश वाडकर

F) न कळता असे ऊन मागून येते,

सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते.

न कळता असे ऊन मागून येते,

सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते.

M) कितीदा हसुनी नव्याने जगावे,

किती रंग या जीवनाचे पहावे.

F) न कळता असे ऊन मागून येते,

सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते.

M) जुई मोगऱ्याला जसा गंध येतो,

नवा गार वारा वनी वाहताना.

F) मना सारखी मी तुझी होत जाते,

तुला सांजवेळी पुन्हा पाहताना.

M) पुन्हा एकमेकास आधार होता,

तुला मी मला तू आता पांघरावे.

F) पुन्हा एकमेकास आधार होता,

तुला मी मला तू आता पांघरावे.

राजेश नारखेडे

F) तुझ्या वाचूनी मी इथे राहताना,

तुझ्या आठवांचा मनी जोगवा रे

घरा सारखे वाटणारे तरीही,

नसे या घराला जुना गोडवा रे...

घरी लोक माझेच सारे तरीही,

असे एकटे पण कसे मी सहावे...

M) जरी आपुले रक्त गोठून गेले.

जरी भोवती सुन्न अंधार आहे.

तुझा हात हातात आहे अजुनी,

तुझी ज्योत जगण्यास आधार आहे.

सुखालाच नाकारताना कशाला,

उगा आज डोळ्यातूनी पाझरावे.

F) कितीदा हसुनी नव्याने जगावे,

किती रंग या जीवनाचे पहावे.

राजेश नारखेडे

नदी जीवनाची तरी वाहते रे,

कधी ऊन वा सावली लागते रे...

.

नवे गाव वाटा नव्या शोधूनी या

दिशा तांबडी रोजची सांगते रे.

पुन्हा एकदा तू जगावे जगावे,

नवे रंग या जीवनाचे पहावे.

पुन्हा एकदा तू जगावे जगावे,

नवे रंग या जीवनाचे पहावे

Follow me please !

Rajesh__Narkhede

Na Kalata Ase Oon Asha Bhosale/ Suresh Wadekar - 歌詞和翻唱