बीज अंकुरे अंकुरेsssssss
ओल्या मातीच्या कुशीतsssss
कसे रुजावे बियाणेsssss
माळरानी खडकात?'
बीज अंकुरे अंकुरे,
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे,
माळरानी खडकात?
कसे रुजावे बियाणे,
माळरानी खडकात?
बीजा हवी निगराणी,
हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ,
त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती,
चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे,
माळरानी खडकात?
बीज अंकुरे अंकुरे,
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे,
माळरानी खडकात?
अंकुराचे होता रोप,
होई रोप ट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात,
उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली,
प्रकाशाचे गीत गातsss
कसे रुजावे बियाणे,
माळरानी खडकात?
बीज अंकुरे अंकुरे,
ओल्या मातीच्या कुशीतsss
कसे रुजावे बियाणे,
माळरानी खडकात?
कसे रुजावे बियाणे,
माळरानी खडकात?
कसे..... रुजावे बियाणेssss,
माळssssरानी खडकातsssss