menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Tuch Tujhi Sobati

Sonalee Kulkarnihuatong
nielsie3huatong
歌詞
作品
कुठल्याश्या वळणावरी असेल गाव ओळखीचे

कुठल्याश्या वळणावरी असेल गाव ओळखीचे

नको घाबरु वळणांना आहे ते तुझ्या सोबतीचे

उघडूनी डोळे बघ मिळतील साथीदार

उघडूनी डोळे बघ मिळतील साथीदार

दाखवतील ते वाट तू चाल बिनधास्त

दूर दूर वाट जाते डोंगराच्या मिठीतूनी

दूर दूर वाट जाते डोंगराच्या मिठीतूनी

पलीकडे उभा असेल तुझ्या यशाचा पक्षी

कोरडा उभा हा उंच भेगा त्याच्या अंतरी

कोरडा उभा हा उंच भेगा त्याच्या अंतरी

उमटती त्याच रेषा तुझ्या तळहातावरी

खडकाची ही वाट लागेल तुला ठेच

खडकाची ही वाट लागेल तुला ठेच

चालावे लागेल तुला तुझे ध्येय हेच

कधी मध्यानीचा सूर्य जीव होईल व्याकुळ

कधी मध्यानीचा सूर्य जीव होईल व्याकुळ

पाणी झिरपता गाली बघ येईल बहर

डोकावतो संधिप्रकाश ह्या उंच पहाडातूनी

डोकावतो संधिप्रकाश ह्या उंच पहाडातूनी

ह्या एकट्या प्रवासात तूच तुझी सोबती

हो जराशी बेफिकीर घे थोडी मजा लुटून

हो जराशी बेफिकीर घे थोडी मजा लुटून

थोडासा वेडा चाळा हीच जिंदगी ची धून

चढायचे आहेच मोठे मोठे डोंगर

चढायचे आहेच मोठे मोठे डोंगर

छोटे छोटे पाऊल टाक अगदी होऊन निडर

दूर ठेव दृष्टी डोंगर रांगातून पार

दूर ठेव दृष्टी डोंगर रांगातून पार

चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार

मनाच्या खोल डोहात जरी वादळे अनंत

मनाच्या खोल डोहात जरी वादळे अनंत

तरी उभा हा निष्चल सर्व भार पेलवित

मग हरायचे नाही बांध निष्चयाची गाठ

मग हरायचे नाही बांध निष्चयाची गाठ

घे नकांशे हाती शोध तुझी तूच वाट

जेव्हा दिसेल शिखर सुख होईल अनावर

जेव्हा दिसेल शिखर सुख होईल अनावर

घेता कवेत आकाश होईल जग जिंकल्याचा भास

ह्या एकट्या प्रवासात, तूच तुझी सोबती

तूच तुझी सोबती

更多Sonalee Kulkarni熱歌

查看全部logo