menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Vitthal To Aala Aala (Lata Mangeshkar) विठ्ठल तो आला आला

Udit Narayanhuatong
"GaneshDhote"huatong
歌詞
作品
विठ्ठल तो आला, आला,

मला भेटण्याला

विठ्ठल तो आला, आला,

मला भेटण्याला

मला भेटण्याला आला,

मला भेटण्याला

विठ्ठल तो आला, आला,

मला भेटण्याला

गीतकार:- पी.सावळाराम

गायिका:- लता मंगेशकर

संगीत:- वसंत प्रभू

तुळशीमाळ घालुनि गळा,

कधी नाही कुटले टाळ

तुळशीमाळ घालुनि गळा,

कधी नाही कुटले टाळ

पंढरीला नाही गेले

चुकूनिया एक वेळ

पंढरीला नाही गेले

चुकूनिया एक वेळ

देव्हाऱ्यात माझे देव

ज्यांनी केला प्रतिपाळ

देव्हाऱ्यात माझे देव

ज्यांनी केला प्रतिपाळ

चरणांची त्याच्या धूळ

चरणांची त्याच्या धूळ

रोज लावी कपाळाला

विठ्ठल तो आला, आला,

मला भेटण्याला

************

ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे

सत्य वाचा माझी होती,

वाचली न गाथा पोथी

सत्य वाचा माझी होती,

वाचली न गाथा पोथी

घाली पाणी तुळशीला,

आगळीच माझी भक्ती

घाली पाणी तुळशीला,

आगळीच माझी भक्ती

शिकवण मनाची ती

बंधुभाव सर्वांभूती

शिकवण मनाची ती

बंधुभाव सर्वांभूती

विसरून धर्म जाती,

विसरून धर्म जाती,

देई घास भुकेल्याला

विठ्ठल तो आला, आला,

मला भेटण्याला

विठ्ठल तो आला, आला,

मला भेटण्याला

मला भेटण्याला आला,

मला भेटण्याला

विठ्ठल तो आला, आला,

मला भेटण्याला

更多Udit Narayan熱歌

查看全部logo
Vitthal To Aala Aala (Lata Mangeshkar) विठ्ठल तो आला आला Udit Narayan - 歌詞和翻唱