गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधून माळा
फुलाफुलांच्या बांधून माळा
मंडप घाला ग दारी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
करकमलांच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे
हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे
नथणी बुगडी लाजे रूप पाहुनी तुझे
बांधू ताई मणि मंगळ सरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधून माळा
फुलाफुलांच्या बांधून माळा
मंडप घाला ग दारी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
भरजरी शालू नेसूनी झाली ताई आमुची गौरी
लग्न मंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी
अंतरपाट सरे शिवा पार्वती वरे लाडकी ही जाई ताई दूरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधून माळा
फुलाफुलांच्या बांधून माळा
मंडप घाला ग दारी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी