logo

Sakhi Mand Jhalya Taarka

logo
الكلمات
सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

आता तरी येशील का? येशील का?

सखी मंद झाल्या तारका..

सखी मंद झाल्या तारका

मधुरात्र मंथर देखणी

आली तशी गेली सुनी

मधुरात्र मंथर देखणी

आली तशी गेली सुनी

हा प्रहर अंतिम राहिला ,

हा प्रहर अंतिम राहिला

त्या अर्थ तू देशील का? देशील का?

सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

हृदयात आहे प्रीत अन

ओठात आहे गीत हि

हृदयात आहे प्रीत अन

ओठात आहे गीत हि

ते प्रेमगाणे छेडणारा,

प्रेमगाणे छेडणारा

सूर तू होशील का? होशील का?

सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

जे जे हवेसे जीवनी,

ते सर्व आहे लाभले

जे जे हवेसे जीवनी,

ते सर्व आहे लाभले

तरीही उरे काही उणे,

तरीही उरे काही उणे

तू पूर्तता होशील का? होशील का?

सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे

थांबेल तो हि पळभरी,

थांबेल तो हि पळभरी

पण संग तू येशील का? येशील का?

सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

आता तरी येशील का? येशील का?

सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका

Sakhi Mand Jhalya Taarka لـ Sudhir Phadke - الكلمات والمقاطع